Salary- आयकर कायद्यानुसार आपले करमुक्त उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कर द्यावा लागतो. कर अकारणीच्या दोन पध्दती आहेत १) जूनी कर आकारणी पध्दत व नवीन कर आकारणी पध्दत. या दोन्ही पध्दतीतील कर आकारणी खालील प्रमाणे आहे.
१) जूनी पध्दत
२) नवीन पध्दत
आपला एका आर्थीक वर्षातील पगार सोबतच खालील बाबी प्राप्त झाल्या असतील तर त्या उत्पन्नात धरल्या जातात.
१) सर्व प्रकारचे वेतन
२) रजेचा प्राप्त पगार
३) मागील कालावधीतील मात्र या आर्थिक वर्षीत मिळालेला पगार
४) देय झालेले मात्र अद्याप न मिळालेले मात्र ३१ मार्च पूर्वी मिळणारे फरक बील
५) वैद्यकीय बील (आयकर कायद्यात सुट दिलेले रोग वगळून)
६) तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्राप्त बील कान, नाक, घसा, मुत्रपींड इ. पकडू नये
७) शासनाद्वारे दिलेल्या विनामुल्य सोयी (उदा कॉटर्स )
८) वेतनाव्यतिरिक्त मिळालेला नफा (मानधन) या सर्वांचा समावेश आयकर आकारणीसाठी करावा लागतो.
House Property -घेतलेले घर भाड्याने दिले असेल तर त्यावर प्राप्त झालेले भाडे
Other Sources- आपणास इतर मार्गाने प्राप्त झालेले उत्पन्न यात दाखवावे जसे की, बचत खात्यावरील व्याज, आऱडी वरील व्याज, आयकर परताव्यावर प्राप्त झालेले व्याज इ. चा समावेश यात होतो.
पगारदार व्यक्तीस मिळणारे करमाफ भत्ते :
१) वाहन भत्ता मर्यादा रु.१६००/- दर महा व अपंग कर्मचाऱ्यास रु.३२००/-दर महा वजावट ( चालू आर्थिक वर्ष २०१८-१९ पासून रद्द )
२) घरभाडे भत्ता : अ) प्रत्यक्ष मिळणारा भत्ता, ब) पगाराच्या ४०% क) प्रत्यक्ष दिलेले घरभाडे यापैकी अ.ब.क.मधील जी कमी रक्कम असेल ती वजावट मिळेल. आवश्यक कागदपत्रे : १) भाडेकरार २) पोलीस व्हेरीफीकेशन
(३) भाडे पावत्या
(४) भाडे बँक खात्यातून दिल्याचा पुरावा बँक स्टेटमेंट किंवा पासबुक झेरॉक्स प्रत
३) मुलांचा शिक्षण भत्ता मर्यादा प्रत्येक मुलामागे रु.१००/- हि वजावट २ मुलांसाठी मिळते.
५) वर्दी भत्ता संपूर्ण रक्कम वजावटीस पात्र आहे. परंतु कामावर असताना वर्दी परिधान करणे आवश्यक आहे.
६) Standard Deduction Rs.50000/
७) इतर. ( टीप करमाफ भत्यांची वजावट घेताना विशिष्ट अटी पूर्ण केल्यावरच वजावट मिळते. )
करपात्र उत्पन्नातून मिळणाऱ्या वजावटी :
१) व्यवसाय कर संपूर्ण रकमेची वजावट मिळते.
२) घर कर्जावरील व्याज (Section २४ व 80 EE व EEA) : रु.२ लाख पर्यंत भरलेल्या व्याजावर वजावट मिळतेआवश्यक कागदपत्रे घर कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी घर कर्जाचे स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. घर कर्ज देणारी आर्थिक संस्था अधिकृत घर कर्ज देणारी मान्यताप्राप्त आर्थिक संस्था असावी.
३) अवलंबून असलेल्या अपंग व्यक्तीच्या औषधोपचार व पालनपोषणासाठी केलेला खर्च : कलम ८० डी डी बी नुसार वजावटीची मर्यादा रु.७५०००/- व गंभीर अपंगत्व असल्यास रु.१२५०००/- ची वजावट मिळते. म्हणजेच ४०% ते ९०% = रु.७५०००/- वजावट व गंभीर अपंगत्व रु.१२५०००/- ची वजावट मिळते. अपंग प्रमाणपत्र देणे आवश्यक.
४) शारीरिक दुर्बलता (अपंग) असणाऱ्यांना मिळणारी वजावट : वजावटीची मर्यादा रु. ७५०००/- व गंभीर अपंगत्व असल्यास रु.१२५०००/- ची वजावट मिळते. म्हणजेच ४०% ते ९०% = रु.७५०००/- वजावट व गंभीर अपंगत्व रु.१२५०००/- ची वजावट मिळते. अपंग प्रमाणपत्र देणे आवश्यक
५) विशिष्ट आजारांच्या औषधोपचारावर केलेल्या खर्चाची वजावट : वजावटीची मर्यादा रु.६००००/ मेडिकल खर्च बिल आपल्या कार्यालयास सादर केल्यास याची सूट मिळणार नाही. तसे हमीपत्र मेडिकल बिल सादर केले नाही व करणार नाही त्या संबंधी आपल्या कार्यालयाचे पत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. डॉक्टरकडून फॉर्म नं १० आय भरून घेणे अनिवार्य असून त्यासोबत खर्चाच्या पावत्या देणे आवश्यक आहे. (हि सवलकत) विशिष्ट आजारांच्या खर्चावरच वजावट मिळते..
आजारांची नावे ब्लाइंडनेस, लो व्हिजन, लेप्रसिक्यूई हिअरिंग इपेअरमेंट लोकोमीटर, Disability, मतिमंदत्व, मॅटल रीटार्डेशन आणि ओटीझम, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, मानसिक आजार इ. अर्थात जे आजार बरे होत नाहीत व व्यक्ती अपंग किंवा काम न करण्याच्या क्षमतेचा राहण्यासारखे आजार
६) उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज : वजावटीला मर्यादा नाही आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी कर्जाचे स्टेटमेंट किंवा प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
७) उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज : वजावट मर्यादा रु.१५००००/
इलेक्ट्रिक कार कर्जाच्या व्याजाची वजावट घेण्यासाठी कर्जाचे स्टेटमेंट किंवा
प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
कलम ८० सी
गुंतवणूक वजावटी : (मर्यादा रु.१५००००/- सोडून)
१) केंद्र सरकारची नवीन पेन्शन योजना एन पी एस (मर्यादा रु.५००००/-)
कलम ८० सी सी डी (1बी) नुसार स्वतः किंवा व्यक्तिगत गुंतवणूक केलेली रक्कम
आवश्यक कागदपत्रे स्टेटमेंट किंवा रिसीट
कलम ८० सी सी डी (२) नुसार पगारात एन पी एस स्वरुपात मिळणारी रक्कम पगारातून कपात करून एन पी एस कपात करून गुंतवणूक केलेली रक्कम
महत्वाचे -
१) १ कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना १२% सरचार्ज भरावा लागेल.
२) ५ लाख पेक्षा कमी करपात्र उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना रु.१२५००/- ची सूट आहे (कलम ८७ अ नुसार)
३) नवीन पद्धत स्वीकारल्यावर पुढील वर्षापासून नवीन पद्धतीनेच कर आकारणी केली जाणार असून नवीन पद्धतीने कर आकारणी करताना पुढील २-३ वर्षात करत असलेल्या गुंतवणुकीबाबत आधीच विचार करून कर पद्धत निवडावी.
करगणना
4 TOTAL TAXABLE INCOME
5 Tax on Total Income
6 TOTAL TAX PAYABLE
7 Rebate On Total Tax ( Rs 12500) under Section 87A
8 Total Tax Payable (13-14)
9 Education Cess 4% I T under14 above
10 Total Tax Payable (8+9)
11 Less: Relief under section 89 (attach Form 10E)
12 Income Tax deducated
13 Balance of tax payable (17-18)
14 Tax Payable or Refundable
No comments:
Post a Comment