स्वादासाठी म्हणून आपण फोडणीत जिरं घालतो, पण चवीसोबतच आरोग्य सुधारावं हेही फोडणीतल्या जि-याचं गुपित आहे.
--------------
काही आठवडय़ांपूर्वीच आपण मसाल्याच्या डब्यातल्या जि:यांची तोंडओळख करून घेतली होती. पण, आपल्या मसाल्याच्या डब्यात जे जिरे असतात ते जि:याच्या अनेक प्रकारातले एक असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या चवीसाठी वेगवेगळे जिरे वापरले जातात. प्रत्येक प्रकारच्या जि:यामध्ये एक खास औषधी गुणधर्म असतो हे विशेष.
मुख्य प्रकार तीनच
जि:यांचे प्रकार अनेक असले तरी मुख्य प्रकार तीनच. सफेद जिरे, शहाजिरे किंवा काळे जिरे आणि कलौंजी जिरे असे ते आहेत. आपण फोडणीसाठी आणि मसाल्यांसाठी वापरतो ते सफेद जिरे. शहाजि:याला कृष्णजिरे असं नाव आहे. कलौंजी जि:याला संस्कृतात कालाजाजी, कुंची अशी नावं आहेत.
शहाजिरे :
शहाजिरे हे गरम मसाल्यात आणि मसाले भातासाठी वापरल्या जाणा:या कच्च्या मसाल्यात वापरली जाणारी गोष्ट आहे. आपल्या सफेद जि:यापेक्षा गडद, जवळजवळ काळ्या रंगाचे आणि लहान आकाराचे हे जिरे असते. याचे शास्त्रीय नाव ‘क्युमिनम नायग्रम’ असे आहे. नेहेमीच्या सफेद जि:यापेक्षा याचा स्वाद थोडा वेगळा असतो. अर्धा ते एक मीटर उंचीर्पयत वाढणारी शहाजि:याची रोपं काश्मीर, गढवाल, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, उत्तर हिमालयाच्या पर्वतीय क्षेत्रत वाढवली जातात. पंजाब, बिहार, आसाममध्येही शहाजिरे उत्पादित होतं. या रोपाची फुलं फिकट निळ्या रंगाची असतात. शहाजि:याला एक विशिष्ट सुगंध असतो आणि चवीला ते जरा तिखट असतं. शहाजि:यात चांगल्या प्रमाणात प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, चोथा, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅगAेशियम वगैरे असतात. अॅन्टिओक्सिडंट गुणधर्मही त्यात आहेत.
शहाजि:यामध्येही औषधी गुणधर्म आहेत. कफ आणि वातदोष कमी करण्याची क्षमता त्यामध्ये असते. तोंडाची दरुगधी दूर करण्यासाठी शहाजिरे चावून खाणं किंवा त्याच्या पाण्याच्या गुळण्या करणं उत्तम समजलं जातं. पोटात घेतले असता शहाजि:याने शौचाला साफ होते. सर्वागावरील सूज कमी होते. बाळंतिणीचं दूध वाढण्यासाठी तसेच गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यासाठी शहाजि:याचा उपयोग होतो. पचनासाठीही ते उत्तम आहे.
कलौंजी :
कलौंजी हे ‘निजेला सतिवा’ या शास्त्रीय नावानं ओळखले जाते. बंगाली मिसळणाचा डबा म्हणजे ‘पंचफोरन’ मध्ये कलौंजी वापरली जाते. अनेक बंगाली पदार्थामध्ये व नानमध्ये हे जिरे वापरतात. हे जिरे चवीला तिखट आणि जरा कडू असते म्हणून याला कडू जिरे असेही नाव आहे. पेशावरी नानमध्ये वरच्या थरात हे जिरे घातलेले असते. अगदी शुद्ध प्रतीचे शहाजिरे खूपवेळा उपलब्ध नसते तेव्हा त्याच्याऐवजी हे जिरे वापरले जाते. कलौंजी हा जि:याचा प्रकार म्हणून त्याचं वर्गीकरण झालं असलं तरी काळं कांद्याचं बी म्हणूनही ते प्रसिद्ध आहे.
कलौंजी अनेक प्रकारच्या दुखण्यांवर औषध म्हणून वापरली जाते. श्वासमार्ग, पचनसंस्था, मूत्रपिंड, यकृत या सर्वासाठी आणि उत्तम रक्ताभिसरण व रोग प्रतिकारक शक्तीसाठी शहाजिरे आणि कलौंजी दोन्ही उत्तम समजली जातात. या जि:यांच्या तेलामध्ये निजेलोन हे रसायन असते. ज्याचा उपयोग अस्थमा, ब्रॉँकायटिस, खोकला यावर होतो असं हल्ली गिनीपिग्जवर झालेल्या संशोधनामध्ये आढळलं आहे. कलौंजीतील काही रसायनांचा उपयोग पोट, डोळे व यकृतातील जखमा व टय़ूमर्ससाठी होतो, तसेच मूतखडे कमी करण्यासाठी होतो. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीतील कायमेल कॅन्सर सेंटरमधील संशोधनात असं आढळलं आहे की, कलौंजीच्या तेलातील थायमोक्विनोन हे रसायन स्वादूपिंडातील कर्करोग पेशींची वाढ थांबवतं व त्यांचा नाश करतं. हे संशोधन जरी बाल्यावस्थेत असलं तरी त्यातून असा निष्कर्ष नक्की निघतो की, भविष्यात या रसायनाचा उपयोग शल्यचिकित्सा झालेल्या, केमोथेरपी घेत असलेल्या आणि ज्यांना कर्करोग होण्याची खूप शक्यता आहे अशा रुग्णांना होऊ शकेल.
जिरे पूड :
अनेक पदार्थात वरून भुरभुरण्यासाठी जिरे पूड लागते. जिरे पूडीमुळे पदार्थाना, सरबतांना छान चव येते. पण ही जिरे पूड विकत आणण्यापेक्षा घरी केलेली चांगली. यासाठी तव्यावर जिरं थोडं गरम करावं म्हणजे त्यातली आद्र्रता कमी होईल. मग ते मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पूड करावी. हे करणं अगदी सोपं असतं आणि भेसळ नसलेली शुद्ध पूड आपल्याला मिळते. धने आणि जि:याची पूड अनेक पदार्थामध्ये वापरली जाते.
सामोशाच्या आवरणाच्या पारीच्या पिठात जिरे घातलेले असते. कोकम सरबत, ताक यामध्ये जिरेपूड घातल्यास उत्तम स्वाद येतो. जलजि:यासारख्या क्षुधावर्धक सरबतात जिरं असतं. जिरं फक्त भारतातच वापरलं जातं असं नाही. पाकिस्तान, श्रीलंका, उत्तर आफ्रिका, मध्य पूर्वकडील देश, क्यूबा, मेक्सिको इत्यादी देशांमध्येही स्वयंपाकात आणि औषधासाठी जिरे, शहाजिरे, कलौंजी यांचा वापर केला जातो.
अत्यंत औषधी आणि शरीराला आवश्यक अशी फोडणीतर्फे आणि मसाल्यांतर्फे स्वयंपाकात केलेली जि:याची, शहाजि:याची, कलौंजीची योजना चतुराईची आहे यात शंकाच नाही. पण त्याचा वापर मर्यादितच हवा नाहीतर त्रस होऊ शकतो.
No comments:
Post a Comment