शेपू
ही स्निग्ध,तिखट भूक वाढविणारी, उष्ण, मूत्ररोधक,बुद्धिवर्धक असुन कफ व वायूनाशक असते. याचे सेवनाने दाह शूळ नेत्ररोग तहानअतिसार यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.
शेपू - शेपू या भाजीस "आहारीय केरसुणी' म्हणावे लागेल. पोटात अडथळा निर्माण करणाऱ्या वायूचे नि:सरण उत्तम प्रकारे ही भाजी करते. पोटात गॅस होणे, अजीर्ण, क्षुधामांद्य, कृमी अशा अनेक पचनाच्या तक्रारींवर शेपू गुणकारी समजली जाते. उग्र वासामुळे कुणाला फारशी प्रिय नसणारी ही भाजी खरे तर अतिशय औषधी आहे. बाळंतिणीने शेपूची भाजी खाल्ल्यास बाळाच्या पोटात गॅसेस होत नाहीत, असा समज आहे. शेपूत अनेक औषधी तेले आहेत. यातील युगेनॉल हे तेल रक्ताशर्करा नियंत्रित करते, असे आढळून आले आहे. थोडक्याेत, मधुमेहींना शेपूची भाजी चांगली.
शेपूत मेथी व पालकप्रमाणेच "अ', "क' जीवनसत्त्वे, फॉलिक ऍसिड व महत्त्वाचे क्षार आहेत. बैठी जीवनशैली असणाऱ्यांसाठी शेपू हितकर आहे. हालचाल कमी असल्याने आतड्यातून वायू सरत नाही, पोट जड वाटणे, अजीर्ण, भुकेची संवेदना कमी होणे, अशा प्रकारची तक्रार असणाऱ्यांनी हिंग-लसूण-जिरे घालून केलेली शेपूची भाजी वरचेवर खावी. निश्चि तपणे आराम लाभतो. एक वाटी शेपूच्या भाजीत ५१ उष्मांक व ३.६ ग्रॅम फॅट्स आहेत.
गुणकारी शेपू
चव कोथिंबिरीप्रमाणे नसते तर हिला एक विशिष्ट उग्र चव असते. चवीला चांगली नसली तरी हिच्यात भरपूर औषधी गुण आहेत. इतर देशात या भाजीचा वापर सलाड, सूप यांसारख्या विशिष्ट पदार्थात केला जातो तर आपल्याकडे प्रामुख्याने भाजी आणि पराठा करून खाल्ली जाते. अशा या शेपूचे औषधी गुणधर्म जाणून घेऊ या.
* पोटाचे विकार, डोकेदुखी, किडणीचे विकार यासारख्या रोगांवर अतिशय उपयोगी आहे.
* शेपूच्या भाजीमध्ये लो कॅलरीज आणि उच्च प्रतीची पोषणमूल्य असतात.
* शेपूची पानं भाजलेल्या भागावर लावली तर लवकर आराम पडतो.
* या भाजीच्या सेवनाने कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. म्हणून ही भाजी आहारात असावी.
* या भाजीच्या सेवनाने पचनशक्ती वाढवण्यास मदत होते.
* शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
* बी कॉम्प्लेक्स अािण व्हिटॅमिनचं प्रमाण अधिक असल्याने या भाजीच्या सेवनाने निद्रानाशाचा त्रास होत नाही.
* शरीरातील हार्मोन्स संतुलन राखण्यास मदत होते.
* मासिक पाळीचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. यात असलेले फ्लेवनॉइड्स आणि पोषक मूल्यांमुळे मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो.
* शरीरातील रक्तातल्या व्हाईट कॉलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे हृदय संरक्षक म्हणून काम करते.
* यात कॅल्शिअम अधिक प्रमाणात मिळतं. त्यामुळे गुडघेदुखी कमी होते. तसंच हाडांची झीज टाळण्यासाठी हाडं मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
No comments:
Post a Comment