✍🏻 _असा जोपासा तुमचा ब्लॉग लिखाणाचा छंद..!*_
🗞️
🖥️ _लिखाणातून व्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे. लेखक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ब्लॉग ही छान सुरुवात होऊ शकते. गुगलची ही साइट तुम्हाला फुकट ब्लॉग लिहिण्याची संधी उपलब्ध करून देते._
❓ _*ब्लॉग कसा लिहावा/तयार करावा ?*_
▪️ _www.blogger.com या वेबसाइटवर ‘जी-मेल’ने लॉगइन करावे._
▪️ _तिथे डॅशबोर्ड (Dashboard) दिसेल. तुमचे किती ब्लॉग्स आहेत, किती लोकांनी पाहिले आदी माहिती दिसेल_
▪️ _‘New Blog’वर क्लिक करा_
▪️ _त्यानंतर ‘Title’ म्हणजे तुमच्या ब्लॉगचे नाव टाका_
▪️ _‘Address’ म्हणजे तुमच्या ब्लॉगचा internet address उदा.- abc.blogspot.in जो तुम्हाला नंतर बदलता येणार नाही. Theme ही तुमच्या ब्लॉगच्या विषयावरून निवडता येईल._
▪️ _‘New Post’वर क्लिक करा. मग तुम्ही तुमचा ‘blog’ लिहू शकाल._
▪️ _पहिल्या भागात ‘Post Title’ (लेखाचे नाव) दिसेल, दुसऱ्या भागात ‘blog formatting’ चे ‘Tools’ दिसेल._
▪️ _जिथे तुम्हाला ‘typing’ करून तुमचा ‘blog’ लिहिता येईल._
▪️ _ब्लॉग लिहीत असतांना लिखाण पूर्ण झालेले नसेल, तर ‘Save’वर क्लिक करून ते सुरक्षित ठेवता येईल. त्यात एखादा विषयानुरूप फोटोही जोडू शकता._
▪️ _ब्लॉग लिहिल्यावर वाचकांना कसा दिसेल, हे पडताळून बघण्यासाठी ‘Preview’वर क्लिक करा आणि ‘blog’ पूर्ण लिहून झाल्यावर ‘Publish’ करा._
No comments:
Post a Comment