ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?
- 1) ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
- 2) प्रथमतः www.blogger.com वर जा.
- 3) तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
- 4) यानंतर New Blog ला click करा.
- 5) पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
- जसे e.g umeshughade.blogspot.com]
- 6) त्याखालील हवे ते Template निवडा .
- 7) create blog ला click करा .
- 8) निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .
- 9) आता new post वर click करा .
- 10) MSWord प्रमाणे Page open होईल .
- 11) तेथे आपली post तयार करा .
- 12) नंतर publish करा .
- 13) समोरील view blog करून आपली blog website पहा .
- 14) नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
- 15)त्याखालील gadget वर क्लिक करा .
- 16) त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
- 17) हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
- 18) Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
- 19) माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
- 20) नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
- 21) आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
- 22) layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
- 23) शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती ठरवा .
- 24)खाली तुम्हाला live blog दिसेल .
- 25) सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
- 26) आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता.
ब्लॉगचा उपयोग तुम्ही केवळ व्यक्त होण्यासाठीच नव्हे तर तुमच्या आवडीनिवडींबद्दल इतरांना माहिती करून देण्यासाठी, तुमच्या व्यवसायाचा प्रसार करण्यासाठी, एखाद्या आवडत्या ठिकाणाची किंवा खाद्यपदार्थाची इतरांना शिफारस करण्यासाठी किंवा आठवणी शब्दरूपात साठवण्यासाठी करू शकता. सध्या कोणत्याही भाषेत ब्लॉग लेखनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. तुम्हाला ब्लॉगच्या अगदी तयार चौकटी उपलब्ध करून देणारी संकेतस्थळेही उपलब्ध आहेत. तरीही स्वत:चा ब्लॉग सुरू करायचा तर काय करावं, असा प्रश्न पडत असेल तर हे वाचा.
ब्लॉग कसा तयार करावा?
- गुगलचे ब्लॉगर डॉट कॉम(com) हे संकेतस्थळ तुम्हाला विनामूल्य ब्लॉग तयार करण्याची सुविधा देते.
- या संकेतस्थळाला भेट देऊन तुमच्या गुगल अकाऊंट अर्थात जीमेलच्या लॉगइन नावाने साइन इन करा.
- तुम्ही ‘लॉगइन’ करताच समोर दिसणाऱ्या डॅशबोर्डवर तुमचे ब्लॉग किंवा त्याला भेट देणाऱ्यांची संख्या अशी माहिती दिसेल.
- नवा ब्लॉग लिहिण्यासाठी ‘न्यू ब्लॉग’वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर टायटल आणि अॅड्रेससाठी विचारणा होईल.
- ‘Title’ म्हणजे तुमच्या ब्लॉगचे नाव आणि तुमच्या ब्लॉगचा पत्ता (internet address) जो कायमस्वरूपी असेल. तो तुम्हाला बदलता येणार नाही. तुम्ही शीर्षक व पत्ता तुम्ही ज्या विषयावर लिहिणार असाल त्यानुसार निवड करून तेथे नोंदवा. तुमचा ब्लॉग तयार झाला आहे.
- आता या ब्लॉगवर नवीन लेख लिहण्याकरिता New Post क्लिक करा त्यानंतर एक नवीन पान उघडेल जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग लिहू शकाल .
- या पेजवर पहिल्या भागात Post Title दिसेल जे तुमच्या ब्लॉगचे अर्थातच लेखाचे नाव असणार आहे. दुसऱ्या भागात blog formatting ¨FZ tools दिसतील. जिथे तुम्हाला टायपिंग करून लेख लिहिता येईल.
- ब्लॉग लिहीत असताना लिखाण पूर्ण झालेले नसेल तर ” Save” वर क्लिक करून ते सुरक्षित ठेवता येईल. एखादा विषयानुरूप फोटो जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो. तो फोटोही तुम्हाला इथे जोडता येतो.
- तसेच ब्लॉग पब्लिश करण्यापूर्वी तो वाचकांना कसा दिसेल हे पडताळून बघण्याकरिता Preview वर क्लिक करा आणि ब्लॉग पूर्ण लिहून झाल्यावर ” Publish” या बटणवर क्लिक करून प्रसिद्ध करा.
ब्लॉगलेखनाचे फायदे
- कोणत्याही विषयावर व्यक्त होता येतं.
- लेखन, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉग करता येतो.
- तुमचे लेखन केवळ देशातच नव्हे तर जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवता येते.
Thank you for this interesting article it did really useful for me as I did learn many terminologies. IFSC full form
ReplyDeleteThe first portion of the code consists of 4 letters representing the lender. Next character is zero that's earmarked for future use. The previous 6 characters would be the identification code of the branch.